‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 7
मुलांच्या विकासाच्या ( वाढीच्या ) टप्प्यावरती पालकांनी करावयाच्या गोष्टी :-
1 ) मुलांवरील प्रेम भरभरून व्यक्त करणे –
प्रेम ही अशी भावना आहे ज्यासाठी प्रत्येक सजीव भूकेलेला असतो. याचमुळे मुलेदेखील आई-वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेली असतात. त्यामुळेच योग्यवेळी योग्य पध्दतीने पालकांनी आपल्या पाल्यासमोर व्यक्त केलेले प्रेम हे त्यांना प्रोत्साहन देणारे ठरते. आई-वडीलांनी आपल्या मुलांसंदर्भातचे प्रेम हे त्यांच्या शब्दातून , कृतीतून तसेच योग्य भावनेच्या माध्यमातून व्यक्त केले पाहिजे.
आपल्याविषयी आपल्या आई-वडीलांच्या मनात प्रेम , काळजी आहे या भावनेमुळे मुलांची मानसिक दृष्ट्या चांगली वाढ होण्यास मदत होते. मुलांवरील प्रेम व्यक्त करताना घ्यावयाची काळजी म्हणजे आपले प्रेम व्यक्त करणे म्हणजे मुलांचे फाजील लाड करणे नव्हे तर योग्यवेळी योग्य पध्दतीने आपल्याला वाटणारे प्रेम प्रकट करणे. उदा. 1) आपल्या नोकरी / व्यवसायाच्या कामातून थोडासा वेगळा वेळ काढून अशा वेळेत त्यांच्याशी संवाद साधणे किंवा त्यांना आवडणारा खेळ खेळणे. मुलांना फिरायला घेऊन जाणे. 2) झोपण्याच्या वेळेच्या अगोदर मुलांना गोष्टी सांगणे त्यांच्यासोबत सकारात्मक विषयावरती चर्चा करणे. 3) मुलांचे मित्र होऊन त्यांना आपले विचार कळू देणे 4) त्याचप्रमाणे काही प्रसंगांमध्ये प्रत्यक्ष शब्दातून बोलून आपले त्याच्यावर /तिच्यावर प्रेम आहे ते प्रकट करावे. 5) तसेच आपल्या शारीरिक हालचालीतून , हावभावातून देखील त्यांच्यावरील प्रेम प्रकट केले पाहिजे.

क्रमश...!
श्री.दिलीप आप्पासो माने.
https://successmv.blogspot.com/
8421699666

No comments:
Post a Comment