Friday, 30 November 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 2

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 2

पालकत्वाचे प्रकार :-

   पालकत्व म्हणजे मुलांना पालकांशिवाय स्वत:च्या हिंमतीवर आनंदी उत्साही व समाधानी जीवन जगण्यास शिकवणे. व ही पालकत्वाची जबाबदारी मुख्यता आई वडीलांवर मुलांच्या जन्मापूर्वीपासून सुरू होते ती त्यांना स्वत:च्या पायावरती उभे करण्यापर्यंत राहते. मात्र या जबाबदारीचे स्वरूप मुलांच्या वाढीच्या त्या त्या टप्यावरती बदलत जाते. मूळातच पालकत्व हीच फार मोठी जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना आईवडीलांना काही नियम लागू असतातच . एकंदर पालकत्वाची जबाबदारी पार पाडताना मानसशास्त्रज्ञांनी त्याचे चार प्रकार पाडले आहेत ते पुढील प्रमाणे .
  1) अधिकार दर्शक पालकत्व ( कडक शिस्त ) :-
 
   या प्रकारचे पालक हे मुलांवरती अधिकार गाजवणारे मी जे सांगतो तेच खरे अशा स्वरूपाचे असतात. मुलांनी मी जे सांगतो तेच ऐकले पाहिजे आणि तसेच वागले पाहिजे असे ठाम मत असते.कडक शिस्त हेच त्यांचे मुख्य शस्त्र असते. या प्रकारात मोठ्यांनी तयार केलेल्या नियम असतात व त्या नियमांचे पालन मुलांनी करावे अशी अपेक्षा असते . व तसे नाही झाल्यास मुलांना कडक शिक्षेच्या मार्गाचा वापर केला जातो. या प्रकारचे पालक मुलांवरती छोट्या छोट्या गोष्टींवर रागावत असतात, त्यांना सतत धाकात ठेवतात .आईवडील या दोन्ही पालकापैकी वडील जर या प्रकारातील असतील तर मूलांवरती सतत सूचना किंवा हुकूम सोडत असतात. व त्यानुसार मुलांनी वागावे अशी त्यांची अपेक्षा असते. आणि जर या प्रकारात आई असेल तर मुलांच्या वागण्या बोलण्याच्या , खेळण्याच्या , अभ्यासाच्या एकंदर सर्वच गोष्टींबाबत अक्षेप असतो. आणि आईवडील दोघेही या प्रकाराचे असतील तर त्या मुलांच्या हातामध्ये काय करावे व काय करू नये याची एक नियमावली दिली जाते . मुलांना शिस्त लावण्यासाठी शिक्षांचा वापर करावाच लागतो असे यांचे ठाम मत असते . परंतु शिक्षांच्या मार्गाने त्वरीत जरी बेशिस्तपणा कमी होत असला तरी हा परिणाम कायमस्वरूपाचा नसतो.
   एकंदर या प्रकारच्या पालकांच्या दृष्टीने त्यांच्या मुलांना कोणत्याही प्रकारची समज नाही व त्यांचा उध्दार व कल्याण करणे ही एकमेवच आपली जबाबदारी आहे असे वाटत असते. त्यामुळे मुलांच्या नैसर्गिक वाढीमध्ये अडथळे निर्माण होतात व कडक शिस्तीचे परिणाम दिर्घकाळापर्यंत त्या मुलांवरती होतात. 
                                                                                                                                         क्रमश...
श्री.दिलीप आप्पासो माने.
https://successmv.blogspot.com/
8421699666