Monday, 4 January 2021

जादुई वि४ भाग -2

 जादुई विचार भाग- 2 

“तुमच्या यशाच्या मार्गातील ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते तिच्या समोर न थांबता तिच्या डोक्यावर स्वार झालात तरच तुमची भिती नाहीशी होते”   


             यश ही अशी गोष्ट आहे जी सर्वाना हवी अशी वाटते मात्र यश संपादन करण्यासाठी ज्या गोष्टी, कृती करायला हव्यात ते करायला मात्र खूप कमी लोक तयार असतात आणि त्यामुळेच कोणतेही क्षेत्र घेतले तर त्या क्षेत्रात खूप कमी लोक यशस्वी झालेले असतात. 
    प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी वेगवेगळ्या कृती करणे गरजेचे असते त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे यश संपादन करण्याच्या मार्गातील अडचणींनवर मात करणे. यशाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या मार्गात अनेक छोट्या-मोठ्या अ‍डचणी,समस्या येतात व अशा अडचणींना घाबरून अनेक जण एकतर प्रवास तिथेच थांबवतात किंवा अगोदरच अशा संकटांचा, अ‍डचणींचा विचार करून यशाच्या मार्गावर जाण्याचे टाळतात. 
    यशाच्या दिशेने वाटचाल करताना मार्गात अडचणी, संकटे ही येतातच व त्यांची भिती वाटणे हे साहजीकच नैसर्गिक आहे. मात्र अशा भितीवरती आपण विजय मिळवू शकतो. त्यासाठी मार्गात  येणा-या अडचणींकडे केवळ बघत राहिलो तर त्याविषयची भिती आधिक वाटत राहते अशा वेळी ज्या कृतीची आपल्याला भिती वाटते तिला समजून घेऊन प्रत्यक्षात ती कृती करायला आपण जेंव्हा सुरुवात करतो म्हणजेच आपण आपल्या संकटासमोर केवळ उभे न राहता त्या संकटाच्या डोक्यावर स्वार होतो. म्हणजेच ती समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागतो अशावेळी हळू हळू आपल्या मनातील त्या कृतीविषयीची भिती नाहीशी होवू लागते व त्या समस्येवर मात करून आपण पुढे मार्गक्रमण करू लागतो.    
    काही वेळातर आपल्या यशाच्या मार्गातील विशिष्ट प्रकारची संकटे येतील असे आपल्याला वाटत असते मात्र अशी संकटे केवळ आपली कल्पनामात्र असतात. प्रत्यक्षात कृती करताना तशी संकटे, अडचणी येतीलच असे नाही. त्यामुळे अनेकजण अशा काल्पनिक भितीपोटीच एखाद्या कामला सुरुवात करण्यापासून दूर राहतात. त्यामुळे जोपर्यंत आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करत नाही व ती कृती करताना अडचणी आपल्या मार्गात येत नाहीत तोपर्यंत अगोदरच अडचणी आपल्या कल्पनेत उभ्या करणे ही देखील एक प्रकारची यशाच्या मार्गातील अडचणच आहे. 
     त्यामुळे अशा कल्पनामात्र असणा-या व प्रत्यक्षात येणा-या अडचणी यांचा जोपर्यंत आपण सामना करता नाही तोपर्यंत त्याच्यातून कसे बाहेर पडावे किंवा कसा मार्ग काढावा हे आपल्याला समजणार नाही त्यामुळे अशाप्रकारे एकदाका तुम्ही यशाच्या मार्गातील अडचणींचा सामना करायला शिकलात की तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळेच तुम्हाला तुमच्या जीवनातील यशाच्या मार्गातील अडचणींची, समस्यांची भिती वाटू नये असे वाटत असेल तर त्या संकटांच्या समोर केवळ त्याच्याकडे बघत उभे न राहता त्या संकटांच्या डोक्यावरती स्वार होणे म्हणजेच त्या समस्येचा सामना करणे आवश्यक आहे व अशावेळीच तुमची भिती नाहीशी होते व त्या संकटावर तुम्ही मात करून यश मिळवू शकता. म्हणूनच आजचा जादूई वि४ आहे “तुमच्या यशाच्या मार्गातील ज्या गोष्टीची तुम्हाला भिती वाटते तिच्या समोर न थांबता तिच्या डोक्यावर स्वार झालात तरच तुमची भिती नाहीशी होते”   
                                     🙏धन्यवाद...!   
                               श्री.दिलीप आप्पासो माने              



No comments:

Post a Comment