जादुई विचार 3
“तुमचे ध्येय जर मोठे असेल तर संगती सुद्धा तशाच व्यक्तींसोबत ठेवा”.
आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो, तोच गटारात पडला तर त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही . तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचे अस्तीत्व नष्ट होते , तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो, आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोती बनतो. थेंब तोच फरक फक्त सहवासाचा, संगतीचा.
संगती खूप महत्वाची आहे कारण आपल्या संगतीचा परिणाम हा आपल्या व्यक्तिमहत्वावर पडतो. म्हणूनच म्हण आहे ना ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीप्रमाणेच आपल्यावर देखील आपल्या संगतीचा परिणाम होत असतो. उदा. तुमची संगती जर अशा लोकांसोबत असेल जे आपल्या Fitness बाबत नेहमी जागृत असतात व नियमित व्यायाम, योग करतात तर तुम्ही देखील आपोआपच स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला सुरूवात करणार किंवा तसे विचार तरी तुमच्या मनात येणार हे मात्र नक्की आणि याच्या उलट तुमच्या संगतीमधील लोक जर आळशी व व्यसनी असतील तर तुम्हाला देखील तसाच प्रकारच्या व्यसनाची सवय लागू शकते. त्यामुळेच तुमची संगती ही योग्य व्यक्तींसोबत असणे गरजेचे आहे. आता प्रश्न हा येतो की कोणत्या व्यक्तींची संगती आपल्यासाठी योग्य आहे व त्यांना कसे ओळखावे ? तर ज्या लोकांच्या सोबत राहिल्यावर तुम्ही मोठी स्वप्ने व ध्येये ठरवून ती कशी पूर्ण करावीत याचा विचार करू लागतात. अशा व्यक्तींची संगती तुमच्यासाठी योग्य आहे.
जीवनात तुमची स्वप्ने, ध्येये मोठी असतील व त्या ध्येयांपर्यंत पोहचण्याची ईच्छा असेल तर तुम्ही अशा लोकांच्या सोबत रहायला सुरुवात करणे आवश्यक आहे जे स्वत: मोठी स्वप्ने बघतात व ती पूर्ण करण्यासाठी पर्यत्न करत असतात. कारण अशा व्यक्तींच्या चर्चा देखील स्वत:ची प्रगती कशी करता यईल याबाबतच असतात ना की दुस-याची निंदा नालस्ती करणे. त्यामुळे त्यांच्यासोबत जेंव्हा तुम्ही असतात त्यावेळी तुम्हाला त्यांच्याकडून एखादे ध्येय प्राप्त करून कसे घ्यावे तसेच यशाकडे वाटचाल करत असताना मार्गातील अडचणींनवर मात कशी करावी वा समजा एकादेवेळेस तुम्हाला अपयश आलेच तरी ते कसे पचवावे व त्या अपयशातून शिकून पुन्हा नवीन सुरुवात कशी करावी यासारख्या अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
समजा तुमचे ध्येय मोठे आहे मात्र तुम्ही ज्या लोकांच्या संगतीत राहतात त्यांचे विचार संकोचित व नकारात्मक असतील तर असे लोक तुम्हाला तुमचे ध्येय प्राप्त करून घेण्यास प्रेरणा देण्याचे सोडून उलट तुम्ही ते ध्येय कसे प्राप्त करु शकणार नाही हेच सांगत राहतील .
संगतीमुळे आपले चालणे-बोलणे, खान-पान, पेहराव, चरित्र अशा अनेक गोष्टी बदलतात. त्यामुळेच चांगल्यां लोकांच्या संगतीत राहिलात तर चांगल्या सवई लागतील व वाईट लोकांच्या संगतीत राहिलात तर वाईट सवई लागतील. शेवटी येवढेच म्हणेन ‘आप का व्यक्तित्व उन पाँच लोगों का Average होता है जिनके साथ आप अपने जीवन का ज्यादा वक्त बिताते है’ म्हणूनच आजचा जादूई वि४ आहे “तुमचे ध्येय जर मोठे असेल तर संगती सुद्धा तशाच व्यक्तींसोबत ठेवा”
धन्यवाद...!
श्री.दिलीप आप्पासो माने

No comments:
Post a Comment