Saturday, 15 December 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 6

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 6


पालकत्वाचे टप्पे :
3)  तिसरा टप्पा –

 शैशवावस्था – ० ते ५ वर्षे
    ‘या वयातील मुले जसजशी मोठी होतात, त्यांच्या भाषेचा विकास होतो, पण भावनांवर नियंत्रण मात्र आलेले नसते  म्हणजे मेंदूची भावनांवर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नसते. त्यातून लहान मुलांचे हट्ट, कधीकधी आकांडतांडव सुरू होतात. मोठे होण्याच्या प्रवासातली ही छोटीशी अवस्था आहे. त्यातून ही मुले लवकरच बाहेर येणार आहेत. आणि तसे त्यांना बाहेर येता यावे यासाठी आपल्या मदतीची गरज आहे, हे पालकांच्या लक्षात असले की, निम्मी लढाई जिंकली. आपोआपच आपण वापरत असलेली भाषा बदलते, आरोप-प्रत्यारोप थांबतात, कारणे दाखवा नोटीस काढली जात नाही, की चूक कोणाची यावर खटला भरला जात नाही. रडणारे मूल त्रासदायक आणि ताणकारक वाटत असले तरी, ते मूल असे मुद्दाम करत नाहीये, या माहितीमुळे निम्मा ताण हलका होतो, मुलाचा आणि पालकांचाही

4) चौथा टप्पा –

 किशोरावस्था – ६ ते १२ वर्षे
 मुले खूपच जिज्ञासू प्रवृत्तीची बनतात , या कालावधीतील मुलांना नवनवीन गोष्टी जाणून घ्यावयाच्या असतात. त्यामुळेच या वयातील मुलांमध्ये आपल्या आसपासच्या परिस्थितीविषयी जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती वाढीस लागते त्याचप्रमाणे त्यांच्यामध्ये सामाजिकता या गुणाची वाढ होऊ लागल्याने मित्र बनवण्यास सुरवात होते. या वयातील मुलांना समूहात रहायला आवडते.     
5) पाचवा टप्पा –

 कुमारावस्था – १३ ते १९ वर्षे  -
या वयात पालकांनी आपल्या पाल्यांची जपणूक करावी .कारण या वयातील मुलांमध्ये शारीरिक तसेच मानसिक बदल होत असतात.  घरात त्यांच्याही मताला प्राधान्य द्यावे . घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी कुमारांचा सल्ला घ्यावा . व तसेच त्यांना योग्य ठिकांणी मार्गदर्शनही करावे . पालकांनी मुला-मुलींशी जवळीक साधावी , महत्वाचे म्हणजे आपल्या पाल्याला विश्वासात घ्यावे .

No comments:

Post a Comment