Wednesday, 5 December 2018

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 5

‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 5


पालकत्वाचे टप्पे :- 
   पालकत्व हा साडेचार अक्षरी शब्द आहे मात्र त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यामुळे या पालकत्वाची सुरूवात कधी आणि कशी होते हा प्रश्न अनेक जणांच्या मनात येतो. 
1) पहिला टप्पा - 
   आपण आपल्या बाळाला केंव्हा आणि कशा मानसिक ,शारीरिक, आर्थिक परिस्थितीत जन्म द्यायचा यावर पतीपत्नी एकमेकांशी मनमोकळे पणाने चर्चा वा विचारविनिमय करतात त्या क्षणापासून पालकत्वाची सुरूवात होते . 
2) दुसरा टप्पा – 
   स्त्री गरोदर असते तो पालकत्वाचा दुसरा टप्पा होय . या टप्प्यावरती पोटातील गर्भ हा आईच्या भावनांशी जोडला गेलेला असतो. या कालावधीतील आईच्या शारीरिक, मानसिक स्थितीचा परिणाम हा बालकाच्या मनावरती होत असतो आणि हा परिणाम बालकाच्या जन्मानंतरच्या पुढील वाढीच्या ट्प्प्यावरती प्रभाव टाकतो. त्यामुळेच आपल्या अनेक शास्त्रांमध्ये देखील गर्भसंस्कारासंदर्भात चे महत्व सांगितले आहे. कारण आपल्या बाळाला काय आणि कसे बनवायचे आहे हे जर पालकांच्या मनात पक्के असेल तर त्याच्यावर संस्कार करण्याचा हा सगळ्यात सुंदर कालावधी आहे.    

No comments:

Post a Comment