‘आनंददायी पालकत्व’ लेखमाला भाग- 3पालकत्वाचे प्रकार :-
2) शरणागत पालकत्व ( संपूर्ण मोकळीक, लाड )
या प्रकारातील पालक हे अधिकार दर्शक पालकत्व ( कडक शिस्त ) यांच्याबरोबर विरोधी प्रकारातील असतात . त्यामुळे यांच्याकडून मुलांना संपूर्णपणे मोकळीक , सूट दिलेली असते. या पालकांना शिक्षा करणे योग्य वाटत नाही त्यामुळे ते मुलांचे अति लाड करण्याचा दूस-या टोकाचा मार्ग अवलंबतात. हे पालक मुलांना अति स्वातंत्र्य देणारे, आवश्यक तेथे नियंत्रण ना ठेवणारे , कधी कधी अति काळजी करणारे असे असतात.त्यामुळे ते आपल्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टींमधील धोके देखील घेवू देत नहीत. मुलांना प्रेम दिल्यास त्या प्रेमापोटी ती साम्यजस पणे वागतात या विचारमुळे ती मुलांबरोबर खूप प्रेमाने वागतात. मुलांना प्रेम करणे म्हणजे त्यांची काळाजी घेणे , त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वत: उचलणे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नहीत याची काळजी घेणे. त्यांना हवे ते देणे मात्र त्यांचाकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करणं. त्यांचे अशा प्रकारचे वागणे हे प्रेमापेक्षा अति लाडाच्या दिशेने जाणारे असते.
पालकांच्या वागण्यामुळे मुले हट्टी स्वभावाची होतात. त्याच्यातूनच ही मुले स्वत: एकाद्या कामाची जबाबदारी स्विकारचे सोडून इतरांवरती ती ढकलण्याकडे यांचा कल असतो. ती दूस-यांवरती अवलंबून राहू लागतात.
आईवडील या दोन्ही पालकापैकी वडील जर या प्रकारातील असतील तर वडीलांकडून पुरवलेल्या जाणा-या हट्टामुळे, अतिमवाळ स्वभामुळे , तर मुले वडिलांना अजिबात किंमत न देता आक्रमक बनतात. प्रसंगी वेडेवाकडे बोलून वडिलांचा अपमान करतात . जर आई या प्रकारात असेल तर ती मुलांचे अति लाड करते आणि मुलांच्या चूकीच्या , अविवेकी वागण्याचे सुध्दा समर्थन करत राहते. आईवडील दोघेही या प्रकारचे पालक असतील तर मुलच या दोघांचे पालक बनतात.त्यामुळे ही मुलं भोवतालच्यांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावण्यातच आपली सगळी शक्ती खर्च करू लागतात.

No comments:
Post a Comment