आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे :-
आपले मूल मोठे होऊन यशस्वी व इतरांबद्दल सहानुभूती असलेली व्यक्ती बनलेली पाहणे, पालक म्हणून तुमच्याकरता किती समाधानकारक असेल याची कल्पना करा...! आपल्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा असे प्रत्येक पालकांना वाटते मात्र व्यक्तिमत्व विकास म्हणजे केवळ भौतिक यश, भरपूर पैसा मिळवण्याची क्षमता, नावलौकिक मिळवण्यासाठीची क्षमता निश्चितच नव्हे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु त्याचबरोबर चांगला, जबाबदार नागरिक होणं, समाजाप्रती संवेदनाशील बनणं तसेच कोणत्याही परिस्थितीत शांत व आनंदी राहू शकणारं सकारात्मक आणि कणखर व्यक्तिमत्व बनणं हे जास्त महत्वाचं. आयुष्यातील चढउतार, यश अपयश सहज स्वीकारता येण्याची क्षमता प्राप्त करणे महत्वाचे. व्यक्तिमत्व विकास विशिष्ठ प्रयत्नांनी करता येतो. पण हे स्वप्न साकार करायचे असेल, तर तुम्ही आपल्या मुलांपुढे कशाप्रकारचा आदर्श ठेवता; त्यांच्यासोबत तुम्ही कितपत वेळ घालवता, त्यांना आपले विचार व भावना मोकळेपणाने सांगता किंवा नाही आणि कशा पद्धतीने सांगता यासारख्या अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. आई वडील हे मुलांचे पहिले गुरू असतात त्यामुळे एक गुरू या नात्याने आपली भूमिका तुम्ही कशाप्रकारे निभावता हे विचारात घ्यावे लागेल. यासाठी आपल्याला मदतगार ठरतील ती म्हणजे ‘आनंददायी पालकत्वाची 21 तत्वे’ आणि या 21 तत्वापैकी पहिले तत्व आहे
मुलं जे बघतात तेच शिकतात...! (बच्चे जो देखते है वही सिखते है)
मुलं आपण जे सांगतो ते करत नाहीत तर आपण जे करतो ते करतात.
त्यामुळे घरात ज्या पध्दीचे वातावरण असते त्या वातावरणाचे , परिस्थितीचे मुले निरीक्षण करतात व त्याप्रमाणे स्वत:चे वर्तन बदलतात.
पालक या नात्याने आपल्याला आपल्या मुलांकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात उदाहरणार्थ मुलांनी योगासने किवा अन्य प्रकारचे व्यायाम करावेत , नियमित अभ्यास करावा , मोबाईचा तसेच TV चा कमीत कमी वापर करावा यासारख्या अनेक गोष्टी मुलांनी कराव्यात असे वाटते व अशाप्रकारची अपेक्षा करण योग्यच आहे. मात्र अनेक वेळा मुलांना अशा बाबतीत सागून देखील त्याप्रमाणे ती वागतीलच असे नाही व अशावेळी आपण मुलांना दोष देऊन मोकळे होतो मात्र या ठिकाणी आपन एक तत्व लक्षात घेत नाही आणि ते म्हणजे ‘मुले आपण जे सांगतो ते करत नाहीत तर आपण जे करतो ते करतात’ मुले जास्तीत जास्त निरीक्षणतून माहिती मिळवत असतात. त्यामुळे घरामध्ये जशा पध्दतीचे वातावरण असते त्या वातावरणाचे , परिस्थितीचे मुले निरीक्षण करतात व त्याप्रमाणे स्वत:चे वर्तन बदलतात. मुले अनुकरण करण्यात तरबेज असतात. त्यामुळे शैशवावस्था (0 ते 5 वर्ष वयोगट) व बाल्यावस्था ( 6 ते 12 वर्ष वयोगट ) या वयोगटातील मुलांचे आईवडील , पालक हे त्यांचे Role Model असतात. त्यामुळे याठिकाणी पालकांनी मुलांच्या समोर एक आदर्श ठेवणे गरजेचे आसते.
मुले जे बघतात तेच शिकतात हे तत्व जेंव्हा आपल्या लक्षात येते तेंव्हा आपण देखील आपल्या वर्तनामध्ये बदल करून मुलांसमोर चांगल्या कृती करतो. त्यामुळे मुले देखील त्याच पध्द्तीने स्वत:मध्ये बदल करतात.
मुलांमध्ये जे बदल आपल्याला अपेक्षित आहेत ते बदल सर्वप्रथम स्वत:मध्ये करणे आवश्यक आहे. उदा. मुलांनी जेवताना TV बघू नये असे वाटत असेल तर सर्वप्रथम घरातील इतर लोकांनी जेवताना TV बंद ठेवला पाहिजे. तेंव्हाच मुले देखील जेवताना TV बघणार नाहीत. याप्रकारेच इतर बाबती देखील मुलांसमोर पालकांना आदर्श ठेवता येतील. आणि ते ठेवणे आवश्यक आहे कारण मुले निरीक्षणातून जास्तीत जास्त माहिती मिळवत असतात.
पालकत्व आनंददायी बनवण्यासाठी उपयुकत असणा-या 21 तत्वापैकी पहिले तत्व आहे मुलं जे बघतात तेच शिकतात...! (बच्चे जो देखते है वही सिखते है)
हे तत्व जेव्हा आपण लक्षात घेतो तेंव्हा आपल्या व मुलांच्या वर्तनात निश्चितच बदल होवू लागतो.
धन्यवाद...!

No comments:
Post a Comment